web-banner-lshep2024

Breaking News

लग्न समारंभाचे माऊली हॉल राजकीय सभांना सोयीचे खर्चाचा हिशोब परवानग्याकडे निवडणूक आयोगाचे दुर्लक्ष?


नामदेव शेलार / मुरबाड : लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या सभा मुरबाडच्या माऊली हॉलवर पार पडत आहेत.त्या बेकायदेशीर हॉलला निवडणूक आयोगाने कायमस्वरूपी परवानगी दिली काय ? तेथील खर्च उमेदवारांच्या हिशोबात दिला जातो का? याकडे निवडणूक आयोगाची डोळेझाकपणा समोर येत आहे.

  लग्न समारंभासाठी हजारो रुपये घेऊन लाईट पाणी जेवण या सर्व सुविधा दिल्या जातात मात्र येथे अनेकांच्या लोकसभा निवडणुकीच्या बैठका सभा मेळावे घेण्यात येतात त्यांना सर्वकाही विनामूल्य आहे काय ?तेथील खर्चाचा लेखाजोखा परवानग्या निवडणूक आयोगाच्या कक्षात येतात किंवा नाही याकडे डोळे झाक तर होत नाही ना? असा सवाल सामान्य नागरिक करत आहेत.

  नॅशनल हायवे रस्त्यावर माऊली हॉल असल्याने मुरबाड, म्हसा ,कर्जत रोड कडे जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतोय कमर्शियल हॉल चालकांना कोणत्या ठिकाणी परवानग्यात दिल्या आहेत.कमर्शियल विद्युत मीटर भरमसाठ पाणी सुविधा कोणी दिल्या याची चौकशी गुलदस्त्यात असून अवैध लग्न हॉल समारंभाची नोंद कायदेशीर झाल्यास रस्त्यावर अडथळा होणार नाही अशा प्रतिक्रिया व्यक्त होत असताना राजकीय जाहीर सभा त्याचा खर्च यांचा हिशोब निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जागामालकाच्या परवानग्यासह सर्व ठिकाणी मागवून कायदेशीर कारवाई करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

 

No comments