web-banner-lshep2024

Breaking News

मतदारांसमोर समर्थकांचा प्रचाराचा ओघ उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचलेच नाहीत...!


नामदेव शेलार / मुरबाड : भिवंडी लोकसभा निवडणुकीत एकूण 27 उमेदवार रिंगणात असून त्यामध्ये 17 अपक्ष उमेदवार आपले भविष्य आजमावत आहेत त्यातील निम्मे उमेदवार मतदार संघामधील मतदारांपर्यंत अद्यापही पोहोचले नाहीत भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात कडवी लढत गृहीत धरून नेत्यांचा प्रचार सुरू असताना आठ लाख कुणबी मतदारांचा अपक्ष उमेदवार निलेश सांबरे आठ लाखाच्या आसपास मुस्लिम समाजाचे मतदार असलेले बहुजन समाज पार्टी एमआयएमचे उमेदवार टपफाइट देत आहेत.

     21 लाखाच्या आसपास मतदान असलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सर्वच मतदारसंघाची नाळ ग्रामीण भागाशी जोडलेली असल्याने योग्य उमेदवाराची निवड या मतदारसंघात होते काँग्रेसची पारंपारिक जागा शरद पवार राष्ट्रवादी गट यांनी हिसकावून घेतल्याने काँग्रेसचा हात गायब झाल्याने वर्षानुवर्ष पंजा आणि घड्याळाला मतदान करणाऱ्या मतदारांना दोन्हीही निशाणी नसल्याने मतदानावर त्याचा परिणाम होण्याची चिन्ह आहेत अनेक ज्येष्ठ निष्ठावंत मतदार आपली वर्षानुवर्षाची निशाणी शोधतात भिवंडी लोकसभा मतदारसंघात नियमित बदल घडल्याचा अनुभव आहे यावेळी राजकीय पक्षाचे उमेदवारावर सर्व स्तरातून नाराजी व्यक्त होत असताना ठराविक बागलबच्चे नौटंकी करताना दिसतात त्याचा राग मतदार सत्ताधारी आणि विरोधकांच्या उमेदवारीवर काढण्याच्या निष्कर्षाकडे वळले आहेत.

      भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपा मोदी वर मते मागून मुरबाड रेल्वे येथील गोडाऊन प्रकल्प नोकरी या विविध समस्या कडे दुर्लक्ष करतात दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे सर्व जुने सहकारी अजितदादा पवार गटात गेल्याने इंडिया आघाडीच्या काँग्रेस शिवसेना नाराजी तिरंगी लढती मध्ये थेट तिसऱ्या क्रमांकावर प्रचार पोचला आहे. अपक्ष निलेश सांबरे यांनी अनेक महिलांना शिलाई मशीन देऊन लाखो युवकांना नोकरी शिक्षण रोजगार देऊन मोफत आरोग्य दिल्याचा प्रचार मुद्दा अमलात आणून निशाणी शिलाई मशीन घेतल्याने खरी लढत भाजपा आणि अपक्ष निलेश सांबरे यांच्या सुरू आहे.

 उच्चशिक्षित अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारात कुणबी आगरी मुस्लिम दलित आदिवासी मराठा अशा सर्व स्तरातून कार्यकर्ते सहभागी होत असल्याने भाजपाच्या उमेदवारावरील पक्षांतर्गत गटबाजी ची नाराजी पक्षातून हकलपट्टी केलेल्या नगरसेवकांचा राग याचा परिणाम वीस मेला दिसून येईल पक्षाच्या आणि अपक्षांच्या समर्थक कार्यकर्त्यांचा प्रचार ओघ मात्र मतदारांच्या दारापर्यंत पोहोचला असून अनेक उमेदवार सर्वच मतदारांपर्यंत पोहोचण्यास अपयशी ठरले आहेत.

No comments