web-banner-lshep2024

Breaking News

''सो सोनार की एक लोहार की'' भिवंडीत निलेश सांबरे यांचे राष्ट्रीय पक्षांना कडवे आहवान दादा-मामाची गोची...!

 

नामदेव शेलार / मुरबाड : एवढ्या दिवस त्यांनी मिळून जा तिच्यासाठी शाळा चालवली त्याच शाळेचा हेडमास्टर जेव्हा परागणात आला तेव्हा साऱ्यांना शाळेचा रंग दिसला अशीच स्थिती आजच्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुरू आहे. गेली कित्येक वर्ष भिवंडी लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा हात होता तेथे भाजपा काँग्रेस सभा अशा अनेक पक्षांच्या उमेदवारांनी निवडणुका लढवून स्थानिक ग्रामीण मतदारांचा फायदा घेतला त्यांच्या विकास कामांना चुना लावण्याच्या चर्चेने राजकीय नेत्यांमध्ये काही राजकीय बदल घडवून भिवंडी लोकसभेत भाजपाला शह देण्यासाठी शरद पवार थेट मैदानात उतरले आहेत मात्र या मतदारसंघातून हाताचा पंजा गायब झाल्याने काँग्रेसी मतदार मावळ्याची तुतारी हातात धरण्यास भिवंडी राजी नसल्याचे चित्र आहे.

        मोठ्या प्रमाणात जनधारेची प्रंतप्रधान मोदींवर नाराजी तसेच दहा वर्षे भाजपाला सत्ता देऊन राज्य पंचायत मंत्री पद दिलेल्या कपिल पाटील यांच्यावर स्थानिक गावागावात ठेकेदारी गोडाऊन प्रकल्पावरून नाराजी याचा फायदा उठवण्यासाठी थेट शरद पवार यांनी काँग्रेसला बाजूला करून मामाला उमेदवारी दिली दोन्हीही उमेदवार आगरी समाजाचे असल्याने त्यांच्यामधील मतांची विभागणी लक्षात घेता कुणबी समाजाचे निलेश सांबरे यांनी वंचितचा पाठिंबा घेऊन राष्ट्रीय पक्षाच्या शेकडो नेत्यांसमोर कडवे आहवान उभे केल्याने भिवंडी लोकसभा मतदारसंघात "सो सोनार की एक लोहार की" असा नारा दिला जात आहे.

              अपक्ष निलेश सांबरे यांनी केलेल्या जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक रोजगार उद्योग व्यवसाय शेती मोफत आरोग्य गरिबांचा आधारवड असा प्रत्यक्ष दर्शनी मतदार दाताचा फॉर्मुला प्रचार फेरीत उभा केल्याने भाजपाचा दादा आणि शरद पवार गटाचा मामा यांची प्रचारात गोची झाल्याची चर्चा आहे. वाडा भिवंडी शहापूर अंबरनाथ बदलापूर मुरबाड या सर्व तालुक्यातील प्रत्येक गाव शहर वाड्या-पाड्यात आप्पाची स्वारी धावत आहे निलेश सांबरे उच्चशिक्षित अभ्यासू तेवढाच प्रचंड श्रीमंत मात्र गरिबांच्या छत्रछायावर हात ठेवून हजारो बहिणींचा भाऊ म्हणून युवकांचा प्रेरणास्थान प्रत्येक मतदाराला स्वतः जाऊन भेट देतो अशा प्रचाराने राष्ट्रीय पक्षाच्या शेकडो नेत्यांचा प्रचार थंडावला आहे.

         राजकारणात युती आघाडी एक ना धड भाराभर चिंध्या अशा स्थितीला कडवे आव्हान देण्यासाठी कुणबी समाजाच्या कार्यकर्ते संघटना वंचित पीडित सामाजिक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिल्याने भिवंडी लोकसभा मतदारसंघात सो सोनार की एक लोहार की अशा प्रचाराकडे मतदारांचे लक्ष वेधलेले आहे. भिवंडी लोकसभेत भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,राष्ट्रवादी अजितदादा गटाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव,आमदार किसन कथोरे, सुभाषदादा पवार, कांतीलाल कंटे,प्रकाश पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार शांताराम मोरे, माजी आमदार पवार असे अनेक शेकडो नेते कपिल पाटील यांच्या सभा प्रचार रॅली साठी येऊन गेले इंडिया आघाडीच्या मामासाठी शरद पवार यांची सभा त्यांची उपस्थिती पेक्षा अपक्ष निलेश सांबरे एकटेच नेते त्यांच्यासोबत हजारो युवक ज्येष्ठ महिला युती कार्यकर्ते प्रचारात सामील झाले आहेत.

            कुणबी समाज निलेश सांबरे यांना केवळ समाजासाठी नाही तर गरिबांच्या मुलांना शिक्षण प्रत्येकाला मोफत आरोग्य नोकऱ्या यासाठी सर्व जाती-धर्माच्या लोकांना न्याय देण्यासाठी सर्वच बहुजन समाज निलेश सांबरे यांना संसदेत पाठवण्यासाठी जागृत झाला असल्याच्या प्रतिक्रिया रमेश शेलार कुणबी सेना नेते यांनी दिल्या आहेत.

No comments