भिवंडी लोकसभेत श्रेयवादाने कपिल पाटील यांना झटका काँग्रेस नाराजीचा बाल्यामामाला फटका अपक्ष निलेश सांबरे यांना दोघांचा फायदा...!
नामदेव शेलार / मुरबाड : भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पहा येथे भाजपा आणि काँग्रेस यांच्यामध्येच गेली कित्येक वर्ष निवडणूक लढाई सुरू होती परंतु यावेळी काँग्रेसचा पंजा गायब झाला हाताचा पंजा निशाणीचे जास्त मतदार मुस्लिम समाजाचे होते त्याचबरोबर सर्व जाती धर्म सर्व समाजाचे होते त्यांच्या मतदानावर परिणाम झाला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात जातीय समीकरण असल्याने त्यांच्या मतदानाची संख्या पाहून प्रत्येक निवडणुकीत उमेदवार प्रत्येक पक्ष देतो तसंच या निवडणुकीत घडलय मात्र भाजपाच्या विजय मिरवणुकीत बाल्यामामाचा अडथळा निर्माण झाला आहे.
आगरी समाजाची जेवढी मते त्याच ताकदीचे दोन्हीही उमेदवार असल्याने मतांची विभागणी होणारच यावर मतदार ठाम आहेत शिवाय भाजपाच्या कपिल पाटील यांच्यावर समाजाची नाराजी असेल त्यापेक्षा कपिल पाटील यांनी पक्षाच्या राजकारणा ऐवजी कपिल पाटील फाउंडेशन मधून भाजपा मधील काही नेते कार्यकर्त्यांना शह देण्याचा प्रयत्न केला त्याचा फटका 50 टक्के बसणारच याच शंका नाही. आता भाजपाच्या कपिल पाटील यांच्या विजयासाठी सुभाष पवार यांनी बहुमत देण्याचे कबूल केले आहे राष्ट्रवादी अजितदादा तेवढीच मते देणार आहेत मग आमदार किसन कथोरे यांना विधानसभेला एक लाख साठ हजार मते मिळाली होती त्यामधील किती असा प्रश्न उभा राहिला आहे.
तिकडे बदलापुरात वामन म्हात्रे आहेत रामभाऊ पातकर आहेत त्यापेक्षा कपिल पाटील यांनी निर्माण केलेले समर्थक कार्यकर्ते आहेत या सर्वांमधून मुरबाड मतदार संघातून कपिल पाटील यांना दोन लाखाच्या वर मते मिळायला पाहिजेत पण तसं होणार नाही मुरबाड विधानसभेच्या चार लाख मतदारांपैकी 50 टक्के मतदान झाल्यास कपिल पाटील यांच्या दोन लाखात बाल्यामामा म्हात्रे आणि निलेश सांबरे तितकेच भागीदार असतील मग कपिल पाटील यांना हॅट्रिक करायला कोणत्या नेत्याचा गट श्रेयाची मलाई चाटेल त्यांनी दिला लीड त्यामध्ये मी ही भागीदार यामधून कपिल पाटील यांना झटका बसणार आहे. दुसरीकडे मागील वेळी बाल्या मामांनी वीस हजार मते मुरबाड मध्ये घेतली होती.
विधानसभेला वामन म्हात्रेंना मुरबाडला 20 हजाराच्या आत मते मिळाली होती यावेळी काँग्रेसची अंतर्गत नाराजी असल्याचा फटका बाळ्यामामाला बसणार असून भिवंडी लोकसभेत गेल्या लोकसभेत कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील यांचा पराभव कुणबी समाजाच्या जिव्हारी राजकीय हवे दावेने लागला होता त्याची भरपाई अपक्ष कुणबी समाजाचे उमेदवार निलेश सांबरे यांना निवडून देण्यासाठी संपूर्ण भिवंडी लोकसभा मतदारसंघात वनवा पेटला आहे अस्तित्वाची लढाई म्हणून समाजाचे नेते मतदार निलेश सांबरे यांच्या प्रचारात उतरल्याने भाजपा आणि राष्ट्रवादी या दोन्हीही राष्ट्रीय पक्षांच्या लढाईत अपक्ष निलेश सांबरे फायदा घेण्याच्या मार्गावर पोहोचले असल्याचे मतदार सांगत आहेत.



No comments