मुरबाडच्या विकासासाठी प्रमोद हिंदुराव यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे कल्याणच्या जाहीर सभेत केला भव्य सत्कार...!
नामदेव शेलार / मुरबाड : महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुरबाड मधील रोजगार वाढीसाठी टेक्सटाइल प्रकल्प उभारण्यासाठी साकडे घालून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चंदनाची भव्य मूर्ती देऊन सत्कार केला सोन्यासारखा माणसाचा सोन्यासारख्या माणसाने जनतेच्या रोजगारासाठी केलेल्या सन्मानाने मुरबाड करांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे गेली 40 वर्ष मुरबाड रेल्वेसाठी प्रमोद हिंदुराव यांनी रेल्वे समिती गठन करून केंद्र आणि राज्य सरकारला साकडे घातले होते.
मुरबाडचा डोंगराळ दऱ्याखोऱ्या मधील आदिवासी गोरगरीब यांच्या मुलांना मुंबई सह शहरी भागात उत्तम दर्जाचा शिक्षण नोकऱ्या रोजगार व्यवसाय मिळावा राज्याच्या चारही दिशाशी मुरबाड तालुका जोडला जावा यासाठी समाजकारण राजकारणातून प्रमोद हिंदुराव यांनी केलेल्या मुरबाड रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदील दिल्याने त्यांचा प्रमोद हिंदुराव,सुनील तटकरे यांनी भव्य चंदनाची मूर्ती देऊन व्यासपीठावर सत्कार केला.
मुरबाड तालुक्याच्या विविध समस्या विकास कामांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून भरघोस निधी मंजूर करून घेतला राज्याच्या मुख्यमंत्र्यांमार्फत विविध प्रकल्प राबवण्यासाठी त्यांच्या झालेल्या प्रयत्नांना यश येत आहे प्रमोद हिंदुराव यांची रोखठोक राजकीय भूमिका सर्वच राजकीय नेते,मंत्री, लोकप्रतिनिधी यांनी अनुभवली आह. मुरबाडच्या नेत्यांकडून पंतप्रधानांचा सन्मान व्हावा ही मुरबाडकरांसाठी सन्मानाची बाब असल्याचे बोलले जाते.



No comments