निवडणुकीचा मौसम संपला वाटप चांडाळ चौकाटी मुळे उमेदवारांना मतांचा फटका ज्यांच्या नावाच्या नोंदी त्यांना जाब विचाराच साहेब..!
नामदेव शेलार / मुरबाड : येत्या लोकसभेच्या पारंगणात असलेल्या प्रमुख उमेदवारांनी आपल्या विश्वासातील समर्थ कार्यकर्त्यांवर पैसा वाटप खर्च करण्याची माणसं जोडण्यापासून मीडिया काबीज करण्याची जबाबदारी दिली होती त्याची विचारपूस उमेदवारांनी करून ज्यांच्या नावाच्या नोंदी त्यांना खरच मदत पोहोचली आहे काय? हे पहावे अशा चर्चेला ऊत आला आहे. निवडणुकीचा मोसम संपला ज्यांनी चांडाळ चौकटीवर विश्वास ठेवला त्याच पुढारपणा करणाऱ्यांना मतदार सामाजिक एकनिष्ठ व्यक्ती निर्भीड पत्रकारांनी भाव दिला नाही त्यांच्या अवकातीची किंव केली नाही आणि त्यांना विचारलं सुद्धा नाही त्याचाच परिणाम वीस मे च्या मतपेटीत प्रत्येकाला दिसून येणार आहे.
बहुसंखिय अलिप्त मतदारांनी मताचा हक्क मताप्रमाणे योग्य उमेदवाराला बजावला आहे मात्र त्याच मतावर डल्ला मारण्याच्या बाता काहीजण करून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करतील. निवडणुकी प्रचार दरम्यान या कार्यकर्त्यांनी शाळा केली असेल तुम्हाला भेटायचं आहे भेट ही घडली असेल तुम्ही लक्ष घाला यातून वेळ घालवून कोरडा प्रचार झाला त्यांना पैसे दिले नाहीत मात्र पुढारपणाच्या डायऱ्या पहा त्यामध्ये खर्चाचे प्रमाण लिहिलेले असेल असं का घडते याचं कारण आहे अमावस्या पौर्णिमेला दारात नावजिक्या आल्यावर काय होतंय असाच उमेदवार बद्दल घडलाय...!
मतदान प्रत्येक निवडणुकीत याच राजकारण्यांनी विकाऊ केला आहे टिकाऊ माणसं सुद्धा लाचार बनवण्याचा काम ग्रामपंचायत नगरपंचायत पासून लोकसभेपर्यंत केल्याने पैशाची अपेक्षा मतदार कार्यकर्ता करू लागला ज्यांनी हा धंदा वर्षानुवर्ष केला आहे त्यांच्या संपत्तीत वाढ होईल तोच पुढचा ठेकेदार होईल कोणी भांडवलदारांना गरिबाच्या जमिनी अल्प पैशात लुबाडून देईल पुढे काय होईल ते होईल मात्र आत्ताच्या निवडणुकीत जेवढे कमविले त्यामध्ये पाकीट मार खुश होतील या भावना अनेकजण मतदार व्यक्त करत आहेत त्यामध्ये तथ्य आहे.
भिवंडी लोकसभेत असाच पुढारपणाचा विश्वास तेथील निवडून येणाऱ्या उमेदवारांना ज्यांच्यावर जबाबदारी दिली होती पैशाची त्यांच्या बाबतीत धोक्याचा ठरू नये असे मत परिवर्तन मतदार करत आहेत मतदारांनी आपलं कर्तव्य निशुल्क बजावला आहे योग्य उमेदवार असताना काही चांडाळ चौकटीच्या वरील नाराजीचा फटका त्यांना बसू शकतो नामुमकीन आणि मुमकिन दोन्ही शब्दाला किंमत दिली गेली नाही कारण जनतेला मतदारांना ज्यांनी गृहीत धरलं त्याचा परिणाम आपल्या मताच्या बेरिजेवर झाला म्हणून विचारपूस करा साहेब या भावना मतदारांच्या आहेत.



No comments