web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड मधील मुजोर प्रशासनावर कारवाईसाठी अजितदादाना साकडे

 


नामदेव शेलार / मुरबाड : गेल्या 15 वर्षात भाजपासेना युतीच्या कालावधीत मुरबाड विधानसभा मतदार संघात शासकीय सर्व कार्यालयात सामान्य नागरिक शेतकर्‍यांची कुचबनाकरून मुजोरपणा करणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करण्यास स्थानिक लोकप्रतिनिधी अपयशी ठरल्याने शासकीय कार्यालयात विविध फाईली योजना प्रलंबित आहेत.

  तहसिलदार कार्यालयात प्रलंबित कामे वेळेवर होत नाहीत परंतु पैसे देणार्‍याची कामे तात्काळ होतात रॉयल्टीची तक्रार केल्यावर संबधितावर तुटपुंज्या दंडाची रक्कम आकारून सेटेलमेंटने सोडून दिले जाते सात पाच मजली इमारती बांधकाम धरकाना तसेच मोहप येथील जिल्हापरिषदेच्या बंधारा पाणी पात्रात बांधकाम केलेल्यावर अद्याप कारवाई केलेली नाही मुरबाड नगरपंचायत हद्दीतील रोठे आळी प्रभाग 7 मधील टेकॉन्स बसेरा इमारतीवर कारवाई झालेली नाही म्हसारोड माळशेजरोड लगत इमारती बांधकामासाठी तहसिलदार कार्यालयासमोर लाखो रूपायाची रॉयल्टी बुडवुन माती उत्खन्न केली आहे त्यावरही कारवाई केलेली नाही.

 मुरबाड नगरपंचायतीचे माहिती अधिकारी हे अर्जदारास माहिती देत नाहीत सार्वजनिक बांधकाम उपअभियंता माहिती अधिकारात माहिती देत नाहीत त्यांनी माहिती दिल्यास कोटी रूपायाचा गैरव्यवहार उघड होणार आहे पंचायत समिती बांधकाम विभाग कृषी आरोग्य पाणीपुरवठा तालुका कृषी अधिकारी वनविभाग सार्वजनिक बांधकाम एमआयडीसी विद्युत मंडळ ग्रामविकास ग्रामीण रूग्णालय भातखरेदी केंद्र बारवी डॅम प्रकल्पग्रस्त या सर्व विभागाच्या विकासकामे प्रलंबित नागरिकाच्या तक्रारी शासनाच्या योजनाचा लाभ यांची चौकशी करून संबधित अधिकार्‍यावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक लोकांनी नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.

गेल्या 10 वर्षात नागरिकांनी सरकार पोर्टलवर तक्रारी केल्या आहेत त्याच्यावर कारवाई झालेली नाही स्थानिक लोकप्रतिनिधी मुजोर प्रशासनाला बळ देतात परंतु प्रशासनावर पक्कड असलेले सडेतोड नेते अजितदादा पवार आपल्याला न्याय देतील भ्रष्टाचाराला लगाम घालतील अशा भावना मुरबाड विधानसभा श्रेत्रातील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

  पाणीपुरवठा योजना आरोग्य विद्युत स्वच्छता सर्वेक्षण रस्ते शौचालय पुर्नरवसन यावर कोटी रूपये शासनाने खर्च करून सुध्दा कामे मार्गी लागली नाहीत त्यांच्या वेदना सामान्य नागरिकांना होत आहेत त्याकडे अजितदादा पवार यांनी लक्ष वेधावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे लोकप्रतिनिधीचा आदेशाचे पालन अधिकारी करतात त्याचा गैरफायदा अधिकारी घेवुन आमचं कोणी वाकडे करणार नाही अशी मुजोर पणा करतात यामुळे लोकं त्रस्त आहेत.

 

 

 

No comments