web-banner-lshep2024

Breaking News

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे 1 कोटी 15 लाख रुपयांचा सावळा गोंधळ

 


नामदेव शेलार / मुरबाड : आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी शासन वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना राबवत असले तरी मुरबाड पंचायत समिती कडून आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचे एक कोटी पंधरा लाख रुपये वाटप करण्यात शिक्षण विभागात सावळा गोंधळ सुरू असुन 125 विद्यार्थ्यांना 16हजार तर 10 विद्यार्थ्यांना 70 हजार रुपये देण्यात आल्याने हि शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना वाटप न झाल्याने हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले असुन शिक्षण विभागाचे कारभारा बाबत सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

             आदिवासी बांधवांची आर्थिक उन्नतीसाठी प्रथम त्यांचे पाल्यांना शिक्षण प्रवाहात आणणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आदिवासी विद्यार्थ्यांना दररोज शाळेत उपस्थिती भत्ता देणे. तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रत्येक वर्षी शिष्यवृत्ती देते.अशा प्रमाणे तालुक्यातील सुमारे तीनशे शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दरवर्षी देण्यात येणाऱ्या सन 2021-22 व 2022-23 या दोन वर्षाचे शिष्यवृत्तीची रक्कम सुमारे एक कोटी पंधरा लाख रुपये मार्च 2022व मार्च 2023 मध्ये विद्यार्थ्यांना वाटप करण्यात शिक्षण विभाग टाळाटाळ करत असल्याने मुरबाड पंचायत समिती कडे एवढी रक्कम अखर्चीत असल्याने शिक्षण विभागाकडून लेखी खुलासा मागविण्यात आला असता शिक्षण विभागाने शाळेच्या पटसंख्येची पडताळणी न करता 125 पटसंख्या असणाऱ्या केंद्र शाळेला फक्त सोळा हजार तर दहा पटसंख्या असलेल्या शाळेला सत्तर हजार, अकरा पटसंख्या असलेल्या शाळेला आठरा हजार रुपये दिल्याने हा रक्कम कशा प्रकारे वाटप करण्यात यावी हे न उलगडणारे कोडे शिक्षकांना पडले आहे.

 

No comments