web-banner-lshep2024

Breaking News

मुंबईत थांबा, मुख्यमंत्र्यांचे आमदारांना फोन, थोड्याच वेळात ‘वर्षा’वर बैठक

 


मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा तिढा सुटला आहे. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली वाढल्या आहेत. आजच दुपारपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आमदारांची मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू झाली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आमदारांना फोन केले आहेत. तसेच वर्षा निवासस्थानी तातडीची बैठकही बोलावली आहे.केंद्राकडून मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील मिळाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज किंवा उद्या कोणत्याही क्षणी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटाकडून चार मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या संभाव्य मंत्र्यांना आणि इतर आमदारांना मुंबईतच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईतच थांबा, कुठे जाऊ नका, असा फोनच मुख्यमंत्र्यांनी कालच या आमदारांना केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

No comments