संजय मलमे यांची शासनाच्या अधिस्वीकृती समितीवर नियुक्ती
मुंबई : दे.नवशक्तिचे संपादक आणि महाराष्ट्र संपादक परिषदेचे अध्यक्ष संजय मलमे यांची महाराष्ट्र शासनाच्या राज्य अधिस्वीकृती समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. संजय मलमे गेली २८ वर्षे पत्रकारितेत कार्यरत असून, त्यांनी यापूर्वीही शासनाच्या विविध समित्यांवर काम केले आहे. २०१५ ते २०१८ या कालावधीत त्यांनी अधिस्वीकृती समितीच्या मुंबई विभागीय समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. आता त्यांची राज्याच्या समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असणार आहे. त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. या समितीवर काम करताना पत्रकार आणि त्यांचे कुटुंबीय यांना शासन दरबारी न्याय मिळवून देण्याची आपली भूमिका राहील, अशी प्रतिक्रिया संजय मलमे यांनी दिली.



No comments