web-banner-lshep2024

Breaking News

अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच मुरबाड विधानसभा मतदार संघात फटके फुटले दादा बाबाचे स्वप्न भंगले

 


नामदेव शेलार / मुरबाड : गेली अनेक वर्षे मुरबाड मतदार संघात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणा-या राष्ट्रवादीने पुन्हा सत्तासिंहासनाची कास धरल्याने मंत्री पदाची स्वप्न बाळगणा-या दादा बाबाचे निराशा झाली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच मुरबाड मतदार संघात फटाक्याची अतिषबाजी झाली. 

गेली १५ वर्षे भाजपाच्या हातात असलेल्या नेतृत्त्वाची चावी राष्ट्रवादीच्या हातात भाजपा वरिष्ठाच्या सहकार्याने मिळणार असल्याचा प्रतिक्रिया कार्यकर्त्यात उमटत आहेत. 

गेल्या तीन वर्षात महाविकासअघाडीची सत्ता होती तदनंतर शिंदेच्या बंडाने पुन्हा भाजपा सत्तेवर आली त्यामुळे आता मंत्रीमंडळाच्या विस्तारात मुरबाडला मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा असताना भाजपामधील गटबाजी उदयास आली . विधानसभा लोकसभेतील प्रतिस्पर्धी एकत्र आले परंतू नेत्यांच्या कार्यकर्त्यात वाटण्या होऊन निर्माण झालेली गटबाजी ठाणे जिल्ह्यात भाजपाला लोकसभा विधानसभा क्षेत्रात फटका देईल यावर भाजपाने नियोजनबध्द तोडगा काढला असल्याचे समोर आले आहे. 

येत्या मंत्रीपंडळात भाजपाचे गणेश नाईक दादा आणि मुरबाड मतदार संघाचे किसन कथोरे काका दोघेही मंत्रीपदासाठी इच्छुक असताना राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना मंत्रीपदाची शपथ देवून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ अजितदादांनी घेतली आणि मंत्रीपद मिळाले नाही तर पुढच्या मार्गाचे दरवाजे भाजपाने बंद केल्याचे बोलले जात आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदाराचे आपत्रेचा आदेश झाल्यास सरकार पडुन राष्ट्रपती राजवट नको म्हणुन पुढील निवडणुका पर्यंतचा तोडगा असल्याचे दिसून येत असून मुख्यमंत्र्याची संधी अजितदादा पवार यांना मिळू शकते असा सुर उमटला जात आहे. ठाणे जिल्ह्यात भाजपामध्ये सत्तासिंहासन गाजवणारे सर्वच राष्ट्रवादी मधुन गेलेले नेते आहेत भाजपा सोबत राष्ट्रवादी युती झाल्याने राष्ट्रवादीत जाणा-याचा ओघ थांबेल .दुस-या पक्षात जावुन निवडुण येण्याची हमी नसल्याने भाजपात गलती होणार नाही यासाठी भाजपा , शिंदेगट , राष्ट्रवादी तिघेही बळ्यान एकत्र सत्तेत आल्याचे स्थानिक सामाजिक कार्यकर्त्याचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीला विस्तारात वाटप होणारी मंत्रीपदाची संक्ष्या दिल्याने इच्छुकांची नाराजी मंत्री पदाचे स्वप्न भंगल्यामध्ये दिसत आहे.

No comments