web-banner-lshep2024

Breaking News

डोंबिवली पश्चिमेत रेल्वे स्थानकापासून ५० मीटर अंतरावर रिक्षांना मज्जाव, कोंडी टाळण्याचा वाहतूक विभागाचा प्रयत्न

 


डोंबिवली: डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी आणि रेल्वे स्थानकात येजा करणाऱ्या प्रवाशांना होणाऱ्या त्रासाचा विचार करुन वाहतूक विभागाने रिक्षा चालकांना रेल्वे स्थानकाच्या प्रवेशव्दारापासून ५० मीटर अंतरापर्यंत रिक्षा चालकांना मज्जाव केला आहे.

    वाहतूक विभागाच्या या निर्णयामुळे डोंबिवली पश्चिम पंडित दिनदयाळ चौक, विष्णुनगर जुन्या पोलीस ठाण्यासमोर होणाऱ्या रिक्षा चालकांच्या गर्दीला पूर्णविराम मिळणार आहे. गेल्या आठवड्यात वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी रेल्वे स्थानकासमोरचे प्रवेशव्दार अडवून रिक्षा उभ्या करणाऱ्या, तेथून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून कारवाई करण्याचा निर्णय घेतला. 

    या निर्णयानंतर पोलीस निरीक्षक गित्ते यांनी रेल्वे स्थानकापासून किमान ५० मीटर अंतरावर रिक्षा चालकांना प्रवासी घेणे आणि सोडण्याचे बंधन घातले आहे. या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षी चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

No comments