मुरबाड मधील तो ''स्वस्त'' दुकानदार देतोय प्लास्टिक तांदुळ;शहरात खळबळ...!
गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड तालुक्यात अन्न भेसळीचे प्रमाणात पुन्हा एकदा वाढ झाल्याचे पहायाला मिळते शीदाप्रत्रिका धारकांना स्वस्त धान्य (रेशनिंग) दुकानातुन चक्क प्लास्टिकचा तांदुळ दिले जात असल्याची धक्कादायक घटना जोगेश्वरी आळी मुरबाड येथील चालक दुकान क्रमांक 6 येथे घडल्याची वृत्त आहे.
मुरबाड आदिवासी पाडयात हे प्लास्टिक तांदुळ काही महिण्यापुर्वी दिले जात होते त्याचे वृत्त आमच्या चॅनेल व वृत्तपत्राने प्रसिध्द केले असता पुरवठा विभाग मुरबाड व तहसिलदार यांनी संबधित दुकानदारांना झाडले मात्र या दुकानदारांनी पुरवठा विभागाशी संगणमत करून ही घडना दडपल्याचे येथील नागरिकांकडुन कळते.
मात्र आता हे प्लास्टिक तांदुळ मुरबाड शहरात वावरू लागले आहेत भेसळयुक्त प्लास्टिक तांदुळ हे मुरबाडच्या सर्व स्वस्त धान्य (रेशनिंग) दुकानात दिले जातात यावर स्वस्त धान्य दुकानदार यांना विचारपुस केल्यास रेशनिंग स्वस्त धान्य देण्यास विलंब केला जातो दादागिरी केली जाते म्हणुन जनता आपला आक्रोश मुठीत ठेवुन हा प्लास्टिक तांदुळ खात आहेत पुरवठा विभागाकडे संबधित तक्रारी केले की हे स्वस्त धान्य दुकानदार खतपाणी देवुन सेटलमेंट करून हा प्रकार दडपला जातो.
शासन आपल्या दारीच्या धरतीवर शासनाने रेशनिंग आपल्या दारी हि मोहमी सुरू करणार असल्याची घोषणा मागील महिण्यात काही मंञ्यांनी केली होती मात्र या घोषणाचा बोजबारा उडाला असुन अशा स्वस्त धान्य दुकानदारानी आपल्या मनमानीने प्लास्टिक तांदुळ लोकांच्या माथी मारण्याचे काम सुरू ठेवले आहे.यावर शासनाने कारवाई करून दुकानाला सिल करून परवाना रद्द करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.



No comments