web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड नगर को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा उपयोग सामान्य नागरिकांला - गणेश नाईक

 



विठ्ठल गडगे / मुरबाड : मुरबाड नगर को.ऑपरेटिव्ह सोसायटीचे उदघाटण माजी मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रीय पंचायत राजमंत्री कपील पाटील ,आमदार किसन कथोरे ,सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव ,माजी आमदार गोटीरामभाऊ पवार ,माजी आमदार दिगंबर विशे ,सोसायटीचे अध्यक्ष तुषारशेठ कडवाडकर ,ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बाबाजी पाटील ,ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार, भिवंडी लोकसभा भाजपा अध्यक्ष मधुकर मोहपे, जिल्हापरिषद माजी सदस्य सुभाष घरत, विश्‍वास थळे केडी म्हात्रे ,सुनिलभाई शेटे, वामन शिंदे ,देवराज म्हात्रे, किसन अनंत कथोरे,अनंत कथोरे ,सागर चंबावणे, दर्शन शेटे, सुनिल शेटे, कैलास शेटे, बाळाराम पाटील हे उपस्थित होते.

            स्मरणिकेचे प्रकाशन माजी मंत्री गणेश नाईक केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्यासह व्यासपिठावर उपस्थितीतांच्या हस्ते करण्यात आले.वेगवेगळया पक्षात असलो तरी समाज हितासाठी आपण सर्वजण एकत्र आलो पाहिजे राजकारणात कोण कुठे आहे

           त्यापेक्षा आपली प्रेरणा महत्वाची असे माजी मंत्री गणेश नाईक यांनी सांगून मुरबाड नगर को ऑपरेटिव्ह के्रडीट सोसायटीचा उपयोग सामान्य नागरिकांला व्यवसायासह घर मौलवान वस्तु घेण्यासाठी होईल असा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष तुषार कडवाडकर यांनी राबवला त्यांना केंद्रीय मंत्री कपील पाटील आमदार किसन कथोरे यांनी मदतीचा हात दयावा अशी सुचना केल्या उपक्रमाची स्तृती केली सावरकारीच्या जाचाला कंटाळुन आत्महत्याचा प्रकार ग्रामीण भागासह शहरी भागात वाढला आहे. पतसंस्थेतुन कर्ज पुरवठा झाल्यास शेतकरी छोटे व्यवसायीकांना त्याचा फायदा होणार आहे.

 

No comments