कुर्ला पोलीस ठाणे अपमृत्यूची नोंद ...!
संजय शेकोकार / मुंबई : कुर्ला पश्चिम येथील इंदिरानगर, एलबीएस रोड, बोहरी कब्रस्तानची भिंतीजवळ, मिठी नदीचे पात्रात एक अज्ञात इसम मृतावस्थेत मिळून आला.
सदर इसमाचे अंदाजे वय 40 ते 45 वर्षे असून कुर्ला पोलीस ठाण्यामध्ये अपमृत्यु नोंद क्र.37/2023 क.174 सी. आर. पी. सी. प्रमाणे दाखल करण्यात आली आहे. सदर अज्ञात मृतदेहाची उंची अंदाजे 5.5 फूट असून शरीरयष्टी मजबूत आहे.
तसेच त्या इसमाचा वर्ण गोरा आहे. या इसमाने लाल रंगाचा चौकडीचा शर्ट, चॉकलेटी रंगाची फुल पॅन्ट अंगावर कपडे घातेलेले आहे. सदर मृत व्यक्तीला कोण ओळखत असेल किंवा त्यांचे नातेवाईक असल्यास कुर्ला पोलीस स्टेशनची संपर्क करावा, असे आवाहन कुर्ला पोलीस उपनिरीक्षक धनलगडे (7721967773) यांनी केले आहे.



No comments