50 हजारापेक्षा अधिक लोकाना दृष्टी देणारा देवदूत डॉ.राजू मुस्कावाड ग्रामीण भागाच्या जनसेवेसाठी पुर्णता जीवन सर्मपित
नामदेव शेलार / मुरबाड : मुरबाड विधानसभासह ठाणे जिल्हयाच्या ग्रामीण भागात आतापर्यंत 50 हजाराच्यावर लोकांवर यशस्वी मोतीबिंदु शस्त्रक्रिया करणारे देवदुत डॉ.राजू मुस्कावाड यांना स्वतंत्र संपादक पत्रकार संघ एनजीओ भारत यांच्या तर्फे देवदृष्टी हा राष्ट्रीय पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात येणार आहे.
मुरबाड विधानसभा मतदार संघात नेत्याच्या वाढदिवस निमित्त मोफत शस्त्रक्रिया शिबीरात 50 ते 60 हजार वयोवृध्द तरूण महिला पुरूष बालकांवर मोतीबिंदु शस्त्रक्रिया डॉ.राजू मुस्कावाड यांनी केले आहे ठाणे जिल्हयाच्या मुरबाड, कल्याण, शहापुर ,भिवंडी ,अंबरनाथ, पालघर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेकडो लोकाच्या डोळयावर मोतीबिंदु शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत शहरी भागामधील ठाणे, उल्हानगर ,भिवंडी ,कल्याण शहरामध्ये एनजीओ ट्रस्टच्या रूग्णालयात दर आठवडयाला रूग्णांवर शस्त्रक्रिया करतात खाजगी सरकारी ट्रस्टच्या रूग्णालयात हजारो मोतीबिंदू रूग्णांच्या डोळयाचा ऑपरेशन करून त्यांना दूरदृष्टी दिली आहे.
गेले अनेक वर्षे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची देशसेवा करणाया डॉ.राजू मुस्कावाड आजही उल्हासनगर, शहापूर ,ठाणे, भिवंडी अन्य ठिकाणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करत आहेत गोर गरीबाना मोफत चष्मे औषधे मिळवुन देवुन शासनाच्या योजनाचा लाभ देवुन दृष्टी गमावलेल्या रूग्णांना पुर्नच दृष्टी देण्याची सेवा डॉ.राजू मुस्कावाड यांनी केल्याने त्यांना राष्ट्रीय देवदृष्टी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
मुरबाड मतदार संघाचे आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या मोफत शस्त्रक्रिया डॉ.राजू मुस्कावाड यांनीच केल्या आहेत गरीबाना दृष्टी पुर्नवसीत केल्याने जीवनात आनंद वाटतो प्रत्येक रूग्णांची दृष्टी जिवीत करण्यासाठी नव्याने तत्रज्ञान मशनरी लेजर आल्याने मोतीबिंदू लवकर होतो रूग्णांना त्रास होत नाही दहा मिनिटात ऑपरेशन होते खर्च आल्प होतो रूग्णांना दुरदृष्टी देणारा देवदृत डॉ.राजू मुस्कावाड यांनी जनसेवेसाठी आपले जीवन सर्मपित केले आहे अशा समाजसेवेचा सन्मान शासनाने केल्यास त्यांची वैद्यकीय सेवा अधिक योगदानाची सर्मपित होईल अशा प्रतिक्रिया मोठया प्रमाणात वयोवृध्द महिला पुरूष रूग्णांनी व्यक्त केल्या आहेत.



No comments