web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड नगरपंचायत मुख्याधिकारी मनोज म्हसे यांची तातडीने उपयोजना मुरबाडकरांना दिले शुध्द पिण्याचे पाणी पुरपरिस्थितीवर नियंत्रण

 


नामदेव शेलार / मुरबाड : गेल्या पाच वर्षात चालत आलेल्या मुरबाड नगरपंचायतीच्या मनमानी मुजोर अविकासीत कारभाराला नवनियुक्त मुख्याधिकारी मनोज म्हसे Manoj Mhase यांनी चाप दिला आहे.

 मुरबाड शहरातील बोगस विकासकामाना पायबध्द घालुन शासनाचा निधी जनतेच्या अतिआवश्यक कामासाठी खर्च करून पारदर्शक प्रशासन चालवण्याचा प्रयत्न केल्याने मुरबाड शहराला अपुरा आणि दुर्षित पाणीपुरवठा होणार्‍या यंत्रणा तातडीने बदलुन  मुरबाड शहराला शुध्द पाणीपुरवठा सुरू केल्याने शहरातील नागरिकांनी मुख्याधिकारी मनोज म्हसे यांचे आभार मानले आहेत.

 दुर्षित पाणी घाणीचे साम्राज्य मधुन साथीच्या रोगाचा संर्सग वाढला आहे त्यावर मातकरण्यासाठी नगरपंचायत हद्दी मधील प्रमुख मोठे नाले शहरातील वस्त्यामधील सर्व गटारी कर्मचारी यंत्रणे मार्फत साफसफाई करून मुरबाड शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवला आहे मुरबाड शहरातील बाजारपेठ रहिवाशी वस्त्या म्हसारोड माळशेज कल्याण महामार्गावरील पुराचे पाणी रस्त्यावर येवु नये यासाठी उपयोजना आसण्यात येवुन प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवल्याने पहिल्याच मुसळधार पावसामध्ये मुरबाड शहरालगतचे रस्ते सुरळीत होते भविष्यात शहराच्या प्रमुख रस्त्यावरून दोन वाहने सुरळीत जातील  शहरातील विद्युत प्रवाह सुरळीत राहिल म्हणुन संबधित यंत्रणाना आर्लट राहण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.

  मुरबाड नगरपंचायत कार्यालयात जन्म मृत्यु दाखले नोंदी तात्काळ घेवुन नागरिकांच्या तक्रारी तात्काळ निकाली काढण्याचा तिढा उचल्याने काम चुकार मुजोरशाही करणार्‍या कर्मचार्‍याना चाप बसला आहे.कार्यालयातील प्रलंबित तक्रारी निकालात काढव्यात माहिती अधिकारात तात्काळ माहिती दयावी रस्ते गटारी विकास कामे सुसज्ज करून घेवुन येत्या पावसाळी कालावधीत शहरवासियांना पुराच्या पाण्यात नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतल्याने नागरिकांनी मनोज म्हसे यांना धन्यवाद दिले आहेत.

    कार्यालयीन इमारत उभारणीसाठी शासनाकडे जागेचा पाठपुरावा करून मुरबाड शहराचा रिंग रूट मार्ग तयार करण्यावर भर दिल्याने पुढच्या वर्षी शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा स्वप्न शासनाच्या उपलब्ध निधीवर आवलंबुन आहे शहरातील छोटे मोठे व्यापारी फुटपाथ धारक यांच्यावर अन्याय होणार नाही सर्वानी फुटपाथ मोकळे ठेवावे स्वच्छता बाळगावी करभरणा करावा विकासासाठी सर्वजण एकत्र आल्यास शहराचा विकास वेगाने होईल त्यासाठी प्रशासन कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही म्हसे यांनी दिली आहे.

No comments