ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन
BY - यासीन आतार,युवा महाराष्ट्र लाइव – मोहोळ |
राष्ट्रीय ध्वजसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या
निवेदनात म्हटले आहे, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार प्लास्टिक राष्ट्रध्वज
निर्मितीस व वापरास मान्यता नाही. राष्ट्रध्वज खराब झाल्याचे आढळल्यास ते ध्वजसंहितेतील
तरतूदीनुसार नष्ट करावयाचे असतात. यास्तव कोणतेही खराब ध्वज आढळल्यास ते नजीकच्या स्थानिक
स्वराज्य संस्थेच्या कार्यालयात जमा करावेत , प्लास्टिकचे राष्ट्र ध्वज वापरु नयेत.
असे आहवान करण्यात आले आहे.


No comments