web-banner-lshep2024

Breaking News

विविध कौशल्ये आत्मसात करण्याची गरज : चव्हाण

BY - यासीन आतार,युवा महाराष्ट्र लाइव – मोहोळ, सोलापूर |
शिक्षणाबरोबरच विविध कौशल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन प्राप्तीकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त बी.वाय.चव्हाण यांनी आज येथे केले.
 जागतिक आदिवासी दिनानिमित्त होटगी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि पारंपारिक नृत्यस्पर्धांचे आयेाजन करण्यात आले होते त्यावेळी श्री. चव्हाण बोलत होते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
श्री. चव्हाण म्हणाले, आदिवासी जनतेच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध योजना आखल्या आहेत.  या योजनांचा लाभ घेऊन आदिवासी तरुणांनी शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजे. पारंपारिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य विकासाचे विविध अभ्यासक्रम देखील करणे आवश्यक आहे. 
संगणक आणि माहिती तंत्रज्ञानामुळे रोजगार, शिक्षण, व्यवसाय या क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत हे बदल आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:मध्ये बदल घडवून आणले पाहिजेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपअधिक्षक आय. एच. आतार होते. 
यावेळी एनटीपीसीचे उप सरव्यवस्थापक विजेंद्रकुमार मीना, प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे, सहायक प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे, लेखापाल सुजाता गायकवाड आदी उपस्थित होते.
श्रीमती कुमरे यांनी प्रास्ताविक केले व जागतिक आदिवासी दिना पाठीमागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी 10 वी व 12 वी  परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या आणि नृत्यस्पर्धेतील विजेत्या पथकांचा गौरव करण्यात आला.त्यावेळी होटगीच्या पोलीस पाटील रेणुका सांगळे, सविता काळे आदी उपस्थित होत्या..

No comments