विविध मागण्यांसाठी जि प कर्मचारी यांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण
BY - युवा महाराष्ट्र लाइव - यवतमाळ |
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कामगार युनियन व इतर मित्र संघटना
यांच्या संयुक्त समनव्य कृती समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या गेल्या अनेक वर्षाच्या
प्रलंबित मागण्यांसाठी आज महागाव पंचायत समिती
येथे विविध मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणीक
उपोषण करण्यात आले. करण्यात आलेल्या लाक्षणिक उपोषणामध्येग्रेड पे मध्ये सुधारणा करण्यात
यावी, नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन
योजना लागू करण्यात यावी, कर्मचाऱ्यांना मिळणारे निवृत्त वेतन जेवढे मिळते तेवढेच वेतन
कर्मचाऱ्यांच्या मृत्यू नंतरतेवढेच वेतन देण्यात यावे,यासह अनेक प्रलंबित असलेल्या
मागण्यासाठी जि प कर्मचारी युनियन च्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले
होते. यावेळी जि. प.कर्मचारी युनियनचे अध्यक्ष स्वप्नील भांगे, आरोग्य कर्मचारी संघटनेचे
लहाने साहेब,वानखेडे मॅडम,परिचर संघटनेचे बावणे, किवले मॅडम, खंदारे,कदम,शिंदे,पी ए
पाटील, एस बी देशमुख, एन मत्प्लवार,जि.के.मस्के, बालाजी बैस, व्ही.एस.वाघमारे, के.व्ही.जोशी,
एस.पी काळे, एस.व्ही.अंदुरे,एन.आय.खान, कु. अल्का पटवे,एन.ए. विशंभर, अरुण खंदारे,
प्रभाताई किवले, के.के. राठोड,व्ही जयळे,श्रीमती पी.डी. किवणे इत्यादी कर्मचारी उपस्थित
होते.


No comments