पतंगीचा मांजा मुलीच्या गळ्याला लागल्याने गळा कापला
BY
- युवा महाराष्ट्र लाइव – दिल्ली |
दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतंग उडवताना वापरणाऱ्या चिनी
मांजाने रविवारी (25 ऑगस्ट) 5 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. ही घटना
दिल्लीच्या खजूरी खास येथील आहे. इशिका असं या
मृत मुलीचं नाव आहे.ही लहान मुलगी आपल्या वडीलांसोबत बाईकवर पुढे बसली होती.
त्यावेळी रस्त्यात पतंगीचा मांजा मुलीच्या गळ्याला लागल्याने तिचा गळा कापला गेला.
या घटनेनंतर मुलीला रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचारापूर्वीच मुलीचा मृत्यू झाला.
या ह्रदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



No comments