मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार
BY
- युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी
राज्यभरातून 58 मोर्चे आणि दोन ठोक मोर्चे काढण्यात आलेले होते. आंदोलन काळात आंदोलकांवर
भादंवि 307 आणि 353 (सरकारी कामात अडथळा आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे) या कलमांसह
सर्व गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले होते. मात्र तरीही मंत्रालयीन अधिकाऱ्यांमुळे हे गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही
केली जात नव्हती. असा आरोप पाटील यांनी लावला आहे. सामान्य विभागाच्या या अधिकाऱ्यांवर
निलंबनाच्या कारवाईची मागणीही त्यांच्या मार्फत करण्यात आली होती. आज सकाळी 11 वाजता
छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस येथून या मोर्चाला सुरुवात होईल. आंदोलकर्त्यांना
अडवले तर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.



No comments