web-banner-lshep2024

Breaking News

आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नाने कोर्ट नाका येथे अशोक स्तंभ पुन्हा उभा

BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नाने कोर्ट नाका येथे अशोक स्तंभ पुन्हा उभा राहत आहे. ठाण्यात कोर्ट नाका येथे पूर्वी जो अशोक स्तंभ होता तो १९८३ साली कळव्याच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रक च्या धडकेत उध्वस्त झाला. त्यामुळे ऐतिहासिक वास्तू नष्ट झाली. ठाणेकरांच्या भावना लक्षात घेऊन ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी त्यांच्या प्रयत्नांतुन व आमदार निधीतून याच ठिकाणी पुन्हा अशोक स्तंभ महापालिकेच्या परवानगीने उभारत असून त्याच्या बाजूला तिरंगा झेंडा घेऊन जाणारे जवान व भारतीय संविधानाची प्रतिमा आहे. अशोक स्तंभ पुन्हा त्याच जागेवर उभा राहत असल्याने ठाणेकर नागरिकांनी आ. केळकर यांचे आभार मानले असून आनंद व्यक्त केला.

No comments