माळरानावरील वस्तीशाळेत भरला पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचावर्ग
BY
- युवा महाराष्ट्र लाइव – सांगली |
पांढरेवाडी जिल्हा परिषद उच्च
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद
शाळा बाबरवस्ती या द्विशिक्षकी शाळेस आदर्श शाळा भेट या उपक्रमांतर्गत भेट देऊन शाळेतील
विविध उपक्रमांची माहिती घेतली. तसेच युथ फॉर जत च्या वतीने शाळेतील दोन्ही शाळानां विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
केले. यावेळी पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थी व शिक्षक विद्यार्थ्यांच्यात रमले.शाळेचे
मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांनी बहुवर्ग
अध्यापन,शैक्षणिक साहित्य निर्मिती,विविध अध्यापन पद्धती याबाबत मार्गदर्शन केले.
चार वर्ग व एक शिक्षक,इंग्लिश मिडीयम
कडे विद्यार्थी व पालकांचा असणारा ओढा या समस्या सर्वत्र असतानाही शाळेतील उपक्रमशील
शिक्षकांनी विविध शैक्षणिक साहित्य,कृतिशील अध्यापन व Elerning चा प्रभावी वापर केल्यास
दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्याना सहजतेने दिले जाऊ शकते याचे आदर्श
मॉडेल स्कूल पहायला मिळाल्याचे उपस्थित शिक्षकांनी मत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांचा
आत्मविश्वास व गुणवत्ता शहरातील नामांकित शाळांच्या तोडीची आहे.शाळेचे कामकाज आदर्श
असल्याचे मत वरिष्ठमुख्याध्यापक रामचंद्र राठोड यांनी व्यक्त केले.यावेळी प्रभारी केंद्र
प्रमुख रामचंद्र राठोड , शिवाजी गायकवाड ,शिवगेनी नरळे,डोंगरसिंग सुर्यवंशी,नरेंद्र
गावित,अभिजीत माळगोंडे ,माजी केंद्र प्रमुख
के.बी.पुजारी,कविता कोरे ,शोभा बाबर , तसेच युथ फॉर जत किरण मालानी,कापड व्यपार्री,
मकरंद सुधाळ, प्रशांत आर्गोडी, सचिन जाधव, बाबु मोटे,आप्पासो मोटे,बाबरवस्ती शाळेचे मुख्याध्यापक
दिलीप वाघमारे युथ फॉर जत चे पदाधिकारी व विद्यार्थी
व शिक्षक उपस्थित होते .
शाळेत लोकसहभागातून भौतिक सुविधा निर्माण
झाल्या असून गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच लोकसहभाग
मिळण्याचे प्रमुख कारण आहे.यावेळी शिक्षकांनी
शाळेतील विद्यार्थ्यांची चाचपणी केली.वाचन लेखन तयारी पाहिली. पहीली मधील विद्यार्थ्याने
पाढे म्हटला तर दुसरीचे विद्यार्थी पाच अंकी संख्याचे अस्खलित वाचन केले,शाळेतील विद्यार्थ्यांचे
हस्ताक्षर व इंग्रजी शब्द ,लेझीम,संचलन,व्यसन
मुक्ती व वृक्ष संगोपन उपक्रम पाहून या विद्यार्थी चकित झाल्या.नुसता झगमगाट व विविध इव्हेंट ची रेलचेल
करत पालकांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या शाळा वाढत असताना कोणतीही फी नसलेली व दर्जेदार
शिक्षण देणारी जिल्हा परिषद शाळाच भारी अशी प्रतिक्रया या शिक्षकांनी दिली.दुपारचे
जेवण व खाऊ जिलेबी ,पूरक आहार शाळेतील बागेत बसून सर्व विद्यार्थी व शिक्षक ,पालक यांनी
आस्वाद घेतला . आज वस्तिशाळेत पांढरेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचा वर्ग भरला असल्याचे
दिसत होते.




No comments