web-banner-lshep2024

Breaking News

कोणती ही सुचना न देता कोपर पूल बंद

BY - सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – डोंबिवली |
काल रात्री 10 च्या सुमारास अचानक कोणती ही सुचना न देता कोपर पूल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याला डोंबिवली मनसेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध करीत पुन्हा सुरु केलाकोपरच्या पुलाला पत्री पूल होवू देणार नाही असा इशारा मनसेने शासकीय यंत्रणांना दिला
रात्री १२  वाजल्या नंतर पुलाच्या दुरुस्तीचे काम करून सकाळी पूल पुन्हा सुरू करा असे सांगुन काम पाडले बंद.गेल्या आठ महिन्यात पासून कल्याणच्या पत्री पुलाचे काम रखडल्याने कल्याण डोंबिवलीकारांना पत्री पुलावर तासनतास वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने डोंबिवली मनसेनं आज हा पवित्र घेत पूल सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे राजेश कदम म्हणाले.अचानक पणे कोणतीही सूचना न देता रात्री उशिरा कोपर पूलावर  वाहतुक कोंडी मुळे नागरीकांचा उद्रेक होत असल्याचे मनसे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी सांगितले.यावेळी मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेधे आणि नंदकिशोर भोसले उपस्थित.


No comments