web-banner-lshep2024

Breaking News

“माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील गौरवशाली अध्याय समाप्त झाला - पंतप्रधान नरेंद्र मोदी

BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
भारताच्या धडाकेबाज माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचं मंगळवारी रात्री निधन झालं. दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या छातीत अचानकपणे दुखू लागल्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. स्वराज यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पण अखेर त्यांची झुंज अयशस्वी ठरली.सुषमा स्वराज यांच्या निधनाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी,काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली.पंतप्रधान मोदींनी ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली. “माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील गौरवशाली अध्याय समाप्त झाला आहे. सुषमा स्वराज यांनी देशासाठी केलेल्या कामांसाठी नेहमीच स्मरणात राहतील.”

No comments