अभिनंदन यांचा स्वातंत्रदिनी 'वीरचक्र'ने होणार सन्मान
BY - युवा महाराष्ट्र
लाइव – नवी दिल्ली |
भारतीय वायू सेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीरचक्र या
पुरस्कारासाने सन्मानित करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनी त्यांना हा पुरस्कार प्रदान
करण्यात येईल. यासोबतच स्क्वाड्रन लीडर मिन्टी अग्रवाल यांनाही युद्ध सेवा पदकाने सन्मानित
करण्यात येणार आहे. पुलवामा हल्ला झाल्यानंतर भारत पाक सीमेवर तणाव होता. दरम्यान भारताच्या हद्दीत
घुसलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना पळवून लावताना 27 फेब्रुवारीच्या सकाळी आकाशात
संघर्ष झाला होता. दरम्यान वर्धमान यांनी पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ 16 फायटर विमान
पाडले होते. त्यांच्या या शौर्यासाठी त्यांचा ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मान होणार आहे.



No comments