मोहोळ पोलीस स्टेशन ,की जप्त केलेल्या वाहनांचा तळ
BY - यासीन आतार,युवा महाराष्ट्र लाइव – मोहोळ |
तालुका पोलीस स्टेशनची जागा ही मोठया प्रमाणात जप्त केलेल्या चारचाकी
वाहनांनी व्यापून गेली आहे. मध्यस्थितीत नव्याने जप्त करण्यात करण्यात आलेले वाहन उभे करण्यासाठीही जागा शिल्लक राहिलेली
नाही. सध्या नदीकाठच्या वाळू पाईटची बेसुमार उपक्षा
चालू असून वाळू उपसा
करण्याऱ्यांवर पोलीस थातुर- मातुर कारवाई करुन वाहन सोडले जाते
व जप्त केलेले वाहन पोलीस स्टेशनच्या आवारात आणून लावले जाते . व कायदेशीर कारवाई होईपर्यत सदरची वाहने हलविता येत नाहीत
. यामुळे पोलीस प्रशासन हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक वर्षापासून भगारात पडलेले
दुचाकी असून त्यादुचाकीचा लिलाव झालेला
नाही. व अपघातग्रस्त , व जात केलेल्या
वाहनाची संख्या वाढली आहे. स्वच्छाता गृहाचा परिसर शासकीय वाहने
लावण्यासाठीची जागा जप्त केलेल्या
वाहनांनी भरून गेला आहे. व येणाऱ्य नागरिकांना
वाहनांचा अडथळा पार करीत स्वच्छता गृहाकडे जावे लागते. जप्त केलेल्या
वाहनांमध्ये अवैधरित्या पकडलेल्या डपींग, टॅक्टर व इतर
वाहनांची संख्या अधिक आहे नवीन कायदयातुसार
अवैधरित्या वाळू उपसा करताना आढळल्यास करण्यात
येणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे.
अनेकदा गुन्हा दाखल झालेल्या
संबंधित व्यक्ती कडून याबाबत पाठपुरावा
केला जात नाही. किंवा दंड भरला जात नाही .त्यामुळे जप्त केलेली
वाहने ही
वर्षानुवर्षे पोलीस स्टेशन आवारात धूळखात पडून असतात . अपघातग्रस्त झालेल्या
वाहनांची आवश्यक कागदपत्राची पुर्तता करण्यात न आल्याने वाहने अडकून पडतात



No comments