राम मंदिर मुद्दे पुढे आणून तुमचं लक्ष विचलित करायचे प्रयत्न सुरु - राज ठाकरे
BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी पत्रकार परिषद घेत
सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. या भाषणात त्यांनी मोदी-शहांना पुन्हा लक्ष केले
आहे. तसेच महाराष्ट्रातील पुरपरिस्थितीसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या
गुरुवारच्या भाषणांमधील मुद्द्यांवरही त्यांनी घणाघात केला आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी काश्मीरात रोजगार निर्माण करु सांगत आहेत. पण जिथे रोजगार उपलब्ध होत
नाही त्याच काय? असा सवाल त्यांनी विचारला आहे. त्यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य करत
सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.राज ठाकरे बोलताना म्हणाले की, काल नरेंद्र मोदी
म्हणाले की 370 कलम काढल्यावर काश्मीरमध्ये रोजगार निर्माण करू, पण अनेक राज्यात
भाजपची सत्ता आहे, मग तिथे गेल्या 5 वर्षात रोजगार का निर्माण करू नाही शकलात?
गेल्या 45 वर्षातला बेरोजगारीचा आकडा सगळ्यात जास्त आहे. यासोबतच ते म्हणाले की,
देश आर्थिक गर्तेत चालला आहे पण मोदी भक्तांचं लक्ष नाही, ते सध्या आनंदात आहे,
त्यांच्यावर जेंव्हा ह्या आर्थिक संकटाची कुऱ्हाड कोसळेल तेंव्हा कळेल. ह्या
आर्थिक अडचणींकडे लक्ष जाऊ नये म्हणून समान नागरिक कायदा, राम मंदिर मुद्दे पुढे
आणून तुमचं लक्ष विचलित करायचे प्रयत्न सुरु आहेत



No comments