web-banner-lshep2024

Breaking News

कृष्णप्रिया या संत मीराबाईंच्या जीवनावरील भव्य दिव्य नृत्यनाटिकेने रसिक डोंबिवलीकर मंत्रमुग्ध

BY - युवा महाराष्ट्र लाइव – डोंबिवली |
डोंबिवलीच्या रोटरी क्लब डोंबिवली वेस्टने २३ आँगस्ट रोजी रात्री ९.०० वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृहात गरजू मुलांच्या मोफत हृदय शस्त्रक्रियेच्या मदतीसाठी  यशस्वी क्रियेशनच्या संजना ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या  कृष्णा प्रिया ....... मीरा या संत मीराबाईच्या  जीवनावरील महा- नृत्यनाटिकेचे आयोजन केले होते. या नृत्यनाटिकेत अतिशय सुंदर पणे राधा कृष्ण आणि मीरा यांचे प्रेम मांडण्यात आले आहे. नृत्य,गाणी तसेच सुंदर आवाजातील सुत्र संचालनाने ही प्रेम कथा संत मीरेचे लहानपणापासूनचे असलेले कृष्णा वरील प्रेम व त्यासाठी तीने कृष्णाच्या शोधात केलेके भ्रमण, त्या दरम्यानतीला तीला आलेले अनुभव हे सर्व गाणी आणि निवेदनाच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. कृष्ण - राधा आणि कृष्ण - मीरा ह्यांचे प्रेम हे अमरच आहे. त्यांचे नाते शब्दात वर्णन करणे अशक्य परतु ह्यात जे नाते मीरा आणि राधा ह्यांचे दाखवले आहे ते मन लुभावून गेले. राधा आणि ‌मीरेने आपआपल्या शब्दात कृष्णाबद्दल असलेल्या प्रेमाचे वर्णन ऐकताना मन हलकेच भारावून गेले.भारतातल्या अनेक महोत्सवांमध्ये सादर झालेल्या या नृत्यनाटिकेतून मीराबाईची लहानपणापासून ते कृष्णात विलीन होईपर्यंतची कृष्णभक्ती अनुभवायला मिळाली. या नृत्यनाटिकेचे दिग्दर्शक अतुल नारंग तर लेखन विनोद सक्सेना यांनी नृत्यदिग्दर्शन आश्विनी काळसेकर अतुल नारंग आणि सुनीला पोतदार यांनी केले. या नृत्यनाटिकेचे संगीत अनुप जलोटा आणि अव्दैत नेमळेकर यांनी केले आहे . तर अनुप जलोटा, संजना ठाकूर आणि कौशीक देशपांडे यांचे पार्श्वसंगीत मंत्रमुग्ध करुन गेले. शितल तळपदे यांची प्रकाश योजनेने कार्यक्रमाच्या भव्यतेत भर पडली. मीराबाईच्या भूमिकेत नेत्रा केतकर, मीरेचे अंतर्मन साकारणारी संजना ठाकूर, बाल मीरा साकारणारी सारा ठाकूर, कृष्ण साकारणारा दर्शन जयेश यांनी आपापली भूमिका प्रभावीपणे साकारली.
या कार्यक्रमाच्या निधीसंकलनातून अकरा गरजू विद्यार्थ्यांच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया रोटरी क्लब डोंबिवली वेस्टच्या रोटरी प्रगती ट्रस्टने प्रायोजित केल्या तर डोंबिवलीतील इतर ४ क्लबनी एक एक शस्त्रक्रिया प्रायोजित केली आणि त्याचा धनादेश  रोटरी डिस्ट्रीक्ट‌ गव्हर्नर  डॉ मोहन चंदावरकर यांना पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर  चंद्रशेखर कोळवेकर,डिस्ट्रिक्ट चीफ कॉर्डिनेटर  कैलाश जेठानी पेडियाट्रीक अँव्हेन्यू हर्षद ठक्करअसिस्टंट गव्हर्नर अभय कोठारे आणि प्रशांत आंबेकर यांच्या उपस्थितीत क्लबच्या अध्यक्षा दिपाली पाठक, कार्यवाह दिलीप भगत आणि प्रकल्प प्रमुख सुमेधा केमकर यांनी सुपूर्द केला.

No comments