web-banner-lshep2024

Breaking News

तिलारी रामघाट कोसळला

BY - युवा महाराष्ट्र लाइव – सिंधुदुर्ग |

गोवा राज्याबरोबरच दोडामार्ग तालुक्याला कोल्हापूरशी जोडणारा तिलारी घाट जोरदार पावसाने कोसळला आहे. सुदैवाने या वेळी वाहतुकीची वर्दळ नसल्याने कोणताही अपघात झाला नाही. मात्र निम्मा रस्ता खचल्याने हा घाट वाहतुकीसाठी अनिश्चित काळाकरिता बंद करण्यात आला आहे.दोडामार्ग आणि पर्यायाने गोवा राज्याला घाट माथ्याशी अर्थात कोल्हापूर जिल्ह्याची जोडण्यात तिलारी घाट महत्त्वाचा आहे. अत्यंत नागमोडी वळणे आणि अति तीव्र उतारामुळे वाहतुकीसाठी अवघड घाट अशी ओळख या घाटाची आहे. रामघाट या नावानेही या घाटाला ओळखले जाते. तिलारी प्रकल्पाचे काम करताना यंत्रसामग्रीचे ने-आण करण्यासाठी पाटबंधारे विभागाने हा घाट तयार केला होता. गेली 35 वर्षे हा पाटबंधारे विभागाच्या ताब्यात होता. मात्र गेल्या वर्षीच बांधकाम विभागाने हा घाट आपल्या ताब्यात घेऊन कोल्हापूर विभागाकडे वर्ग केला. त्यानंतर या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले.

No comments