web-banner-lshep2024

Breaking News

गोदावरीला पूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

BY - युवा महाराष्ट्र लाइव – नाशिक |

शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने कहर केला आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे, गंगापूर पालखेड धरण समूहांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या जोरदार सरी बरसल्याने पाण्याची पातळी वाढली आहे.नाशकात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. या पाण्यात गाड्या अडकल्याच्या घटनाही घडत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाचे काम केल्याचे सगळे दावे वाहून गेले आहेत.गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसाने नाशिकमध्ये मुक्काम ठोकला आहे. शनिवारी रात्रीनंतर पावसाचा जोर अधिक वाढला. तसेच, पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्येही रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे.

No comments