web-banner-lshep2024

Breaking News

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंसह पाच जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांच्यासह कुलसचिव प्रफुल्ल पवार यांच्यावरही अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतु:श्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये आकाश भोसले यांच्या तक्रारी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे विद्यापीठाच्या उपाहारगृहात वारंवार अळ्या आढळत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले होते. यानंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आता या प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांच्यासह पाच जणांविरोधात न्यायलयात धाव घेतली. त्यांनी या कुलगुरू आणि कुलसचिवांविरोधात तक्रार केली होती. त्यावर न्यायलयाने कुलगुरू आणि इतर व्यक्तींवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुणे विद्यापीठाचे कुलगुरु नितीन करमळकर यांच्यासोबतच कुलसचिव प्रफुल्ल पवार, सिनेट सदस्य संजय चाकण, सुरक्षा संचालक सुरेश भोसले, सुरक्षा रक्षक भुरसिंग अजितसिंग राजपूत या पाच जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* नेमके प्रकरण काय ? *

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भोजनगृहातील जेवणात अळ्या सापडल्या होत्या. याविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. आंदोलक विद्यार्थ्यांनी सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की आणि मारहाण केली. यानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून या विद्यार्थ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करुन चौकशीचे आदेश देण्यात आले होते. यानंतर आकाश भोसले या विद्यार्थ्यांने पुणे पोलिसात धाव घेतली. त्याने पाच जणांवर तक्रार दाखल केली. याप्रकरणी न्यायालयाने या पाच जणांवर अ‍ॅट्रॉसिटीची तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्यांच्यावर अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

No comments