अलिबाग तालुक्यातील उमटे धरण धोकादायक स्थितीत, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
|
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाची योग्य डागडुजी न
केल्यामुळे ते फुटून 23 नागरिकांना प्राण गमवावा लागला होता. तशीच
परिस्थिती अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाची होण्याची शक्यता स्थानिकांनी वेळोवेळी
बोलून दाखवली आहे.सध्या धरणाच्या कमकुवत झालेल्या भिंतीतून पाणी वेगाने झिरपत आहे.
त्याचप्रमाणे धरणाच्या तळाकडील बाजूनेही पाणी बाहेर फेकले जात आहे. त्यामुळे भिंत
फुटण्याचा धोका अधिक वाढला आहे. सुमारे 41 वर्षे वयोमान असणाऱ्या धरणाचे आयुष्य
वाढवण्यासाठी प्रशासनाकडून गेल्या वर्षी वरच्यावर मलमपट्टी करण्यात आली होती.
त्यामुळे यंदाच्या पावसात धरणाची काय स्थिती राहील याबाबत ग्रामस्थांमध्ये घबराट
आहे.



No comments