web-banner-lshep2024

Breaking News

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दरड कोसळली

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ आज पहाटे दरड कोसळली. यामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतेही नुकसान झालेले नाही. शनिवार पासून लोणावळा व खंडाळा घाट परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. रात्री पाऊस आणि वारा मोठ्या प्रमाणात होता. यामुळेच खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ डोंगराचा काही भाग सरकून द्रुतगती मार्गावर आला आहे.या घटनेनंतर मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतुक मंदावली होती. घटनेची माहिती समजताच खोपोली बोरघाट पोलीस व आयआरबीची मदत यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीला या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते घटनास्थळावर दाखल झाले आहेत. 

No comments