पत्रकार संजय हंडोरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्दयार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – भिवंडी |
ठाणे जिल्हयातील भिवंडी तालुक्यातील नांदकर गावातील उपसरपंच व देवा ग्रुप फाऊंडेशनचे धडाडी कार्याची शान म्हणून असणारे सर्व तरूण वर्गांना वेळोवेळी मदतीचे हात देऊन माणुसकी जपणारे मनोजभाऊ पाटील यांनी पत्रकार संजय हंडोरे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हापरिषद शाळेतील शालेय विद्दयार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले.मोठया मनाचे आणि धाडसाचे कर्तव्य तसेच गोरगरिबांचे कल्पवृक्ष म्हणुन आज संजय हंडोरे पाटील यांची ओळख आहे त्यांच्या सहकार्याने तरूण वर्गाला अमुल्य असे योगदान प्राप्त झाले असून नेहमी मदतीला धाऊन जाणारे संजय हंडोरे पाटील यांच्या वाढदिवसाला मोठया प्रमाणात त्यांच्या चाहत्यांनी सामाजिक उपक्रम राबवून त्यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या.सर्व समाजातील नागरिकांचा सत्कार,तरूणवर्गांना एकत्र आणून त्यांच्यासाठी व्यायामशाळा व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात त्यांचा सिहाचा वाटा आहे अशा सिहांच्या मार्गदर्शनाखाली कित्येकांना मार्गदर्शन मिळाल्याने त्यांच्या कार्याचा ठसा आज तरूण वर्गांच्या सामाजिक कार्यातून पाहायला मिळत आहे.असाच एक आगळा वेगळा उपक्रम देवा ग्रुप फाऊंडेशनचे नांदकर गावाचे अध्यक्ष तथा उपसरपंच मनोज पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राबविला.त्याचबरोबर झाडे लावून झाडे लावा आणि झाडे जगवा असा संदेशही दिला.मनोज पाटील यांच्या कौतुकी कामगिरीला लोकनेत्यांनी वेळोवेळी त्यांना विविध अशा गावातील योजनेला मार्गदर्शन करून गावाचा विकास करण्यात सहकार्य केल्याने मनोज पाटील नाव आज भिवंडी तालुक्यासह ठाणे जिल्हयाच्या नकाशावर उमटला आहे.
अवघ्या लहान वयातच सामजिक कार्याचा वारसा पुढे घेऊन जातांना त्यांच्या कार्याच्या ठशातुन दिसून आले आहे.न्याय,निती,धर्म,सत्कर्म,सहानुभुतीचा माणसाला विसर झाला असून स्वैराचाराने माणसाचा राक्षस झाल्याने त्या राक्षसाला पुन्हा माणसात रूपांतर करण्यासाठी मनोज पाटील यांंची कार्यशैली धडपड आज इतरांना भाऊन गेली आहे.त्यांच्या याच कार्याला पाहुन शेकडो तरूणांच्या गळयातील आज मनोज पाटील तावीत झाले आहे.त्यात संजय हंडोरे पाटील यांचे मार्गदर्शन मिळत असून त्यांच्या सामाजिक कार्याच्या गतीत वेग येत आहे.अशा आदर्शवान संजय हंडोरे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांना पुढिल वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या.


No comments