web-banner-lshep2024

Breaking News

नावात देव कोरणारा चित्रकार अनिल गोरे;कलावंताकडे शासनाचे झालेले दुर्लक्ष दुदैवी असल्याच्या प्रतिक्रिया

 BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – रत्नागिरी |

प्रत्येक नावात देव कोरणारा आणि देवात नाव कोरणारा चित्रकार रस्त्यावर चित्र काढत आहे.अशा कलावंताकडे शासनाचे झालेले दुर्लक्ष दुदैवी असल्याच्या प्रतिक्रिया समाजसेवक मिलिंद दळवी यांनी व्यक्त केल्या आहेत.रत्नागिरी मधील चित्रकार अनिल आत्माराम गोरे लहानपणापासून देव दैवता महामानव महापुरूषाच्या फोटोत माणसाचं नांव कोरत असून माणसाच्या नावात देव कोरत आहे.

त्यांचा सन्मान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,माजी मुख्यमंत्री असोकराव चव्हाण अन्य नेत्यांच्या हस्ते सत्कार झाला परंन्तु अशा बुध्दीमान नामकिंत चित्रकाराला बसण्यासाठी 3 बाय 3 जागा मिळाली नाही.शासन दरबारी अनेक पत्रव्यवहार करून सुध्दा चित्रकार अनिल गोरे शासनाकडे उपेक्षतेने पहात आहे.काँगे्रस सरकारच्या राज्यात आपल्याला बसण्यासाठी जागा मिळेल अशी अपेक्षा धरून होता आज भाजपसेनेचा सरकार असताना त्या चित्रकाराला रस्त्यावरच चित्राचे प्रदर्शन करून चाहात्याना ग्राहकांना चित्र काढुन दयावे लागते.
उन्हाळा पावसाळा हिवाळयात सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेर्यंत चित्रकरणाचा व्यवसाय करून साहित्याचे पेठारा घेवुन पुन्हा 25 किलो मिटर अंतरावर प्रवास करावा लागतो हे चित्रकांराचे दुदैव आहे.संपुर्ण कुटूंबाचा उर्धारनिर्वाह त्यांच्या चित्र छायेत असताना कलावंताची कदर आजीमाजी दोन्ही सरकारला करता आली नाही.अशा चित्रकाराला गणपतीपुळे व्यापारी गाल्यामध्ये जागा उपलब्ध करून दयावी अशी मांगणी विकासमंच संस्थेचे  संस्थापक नामदेव शेलार,अध्यक्षा सौ.ज्योती शेलार,कार्यकर्ते मिलिंद दळवी यांनी शासनाकडे केली आहे.

No comments