web-banner-lshep2024

Breaking News

कोकण विभाग पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री.संजय हंडोरे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत स्वप्नज्योती टार्इम्स,युवा महाराष्ट्र लार्इव्ह टि.व्ही चॅनेलच्या वृत्तसंपादिका यांना आमदार किसनराव कथोरे प्रमोद हिंन्दुराव यांच्या हस्ते आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान

BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
सन 2001 सालापासून पत्रकारितेला सुरूवात करून 9 वर्षात शासन यादीवर विरजमान झालेले वृत्तपत्र स्वप्नज्योती टार्इम्स तसेच युवा महाराष्ट्र लार्इव्ह टिव्ही चॅनेलच्या वृत्तसंपादीका सौ.ज्योतीतार्इ नामदेव शेलार यांचा कोकण विभाग पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री.संजय हंडोरे पाटील यांचे वाढदिवसाचे औचित्य साधत व कोकणविभाग पत्रकार संघाचे 7 व्या वर्धापण दिनानिमित्त आमदार किसनराव कथोरे,सिडको माजी अध्यक्ष प्रमोद हिंन्दुराव,देवा ग्रुप फाऊंडेशनचे महाराष्ट्र सचिव तानाजीभाऊ मोरे यांच्या हस्ते आदर्श पुरस्कार देवुन गौरवण्यात आले.त्याच बरोबर अन्य पत्रकार व ह.भ़.प यांचाही सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.विशेषतः शेलार परिवारात संपुर्ण कुटुंब अखंड पत्रकारिता करत असून सामाजिक श्रेत्रात मौलाचे योगदान ठरले आहे.शासनमान्य 80जी मान्यता प्राप्त यादीवरील सामाजिक संस्था आमदार किसनराव कथोरे मुरबाड विधानसभा श्रेत्र विकासमंच ट्रस्टच्या सौ.ज्योतीतार्इ शेलार अध्यक्षा आहेत.मुलांना शासकीय पत्रकार,डॉक्टर,वकील श्रेत्रात घडवुन 30 वर्षे पतीने केलेल्या अखंड पत्रकारितेचा वारसा जोपासणार्‍या सौ.ज्योतीतार्इ शेलार यांचा आदर्श पत्रकार पुरस्कार हा माझे गुरू आणि पती श्री.नामदेव शेलार यांच्या मार्गदर्शनाने मिळाल्याच्या प्रतिक्रिया सत्काराला उत्तर ज्योतीतार्इ शेलार यांनी व्यक्त केल्या.
संपुर्ण महाराष्ट्रात शेकडो प्रतिनिधी आणि आमदार किसनराव कथोरे विकासमंच ट्रस्टचे एक हजार कार्यकर्ते गोवा,राज्यस्थान,गुजरात महाराष्ट्रात ज्योतीतार्इ शेलार यांच्या नियंत्रणाखाली काम करतात.कोणती बातमी कुठल्या पानावर,हवी कोणता, आग्रलेख हवा बातमीची सत्यता निर्भिडता झुंझार पत्रकारांच्या पाठिशी सदैवी उभी राहणारी महिला पत्रकार सौ.ज्योतीतार्इ नामदेव शेलार यांना यापुर्वी राज्यस्तरीय आहिल्याबार्इ होळकर पुरस्काराने अहमदनगर येथे गौरवण्यात आले असुन पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच गोर गरीबाना आरोग्य,शिक्षण,रोजगार,व्यवसाय,विधवा महिलांना शासकीय पेंशन चालू करणे असे विविध समस्या सोडवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत.सौ.ज्योतीतार्इ शेलार यांनी स्वतः त्यांच्या संस्था व वृत्तपत्राच्या वर्धापणदिनी गेली 7 वर्षे प्रत्येक वर्षी 51 जणांना पुरस्कार आणि 450 लोकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते केला असुन महाराष्ट्रात प्रथम 451 आदिवासींचा व्यासपिठावर सन्मान करणारी पहिली महिला पत्रकार ठरली आहे.अशा आदर्श महिला म्हणून ज्योतीतार्इ शेलारांना गौरविण्यात आले.संपुर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेले कोकण विभाग पत्रकार संघ या संघाचे कल्पवृक्ष म्हणून आज संजय हंडोरे पाटील यांना ओळखले जात असून त्यांच्या कार्याची हजारो लोकांमध्ये चर्चेचा सुर आजही उमटत आहे.
12 व्या वर्षी अधिकार्‍यांना वाचविण्याचे धाडस जेव्हापासून केले ते आजही सर्व गोरगरिबांच्या सेवेसाठी तत्पर म्हणून कायम आहे.मुळची माती आणि माणूसकीची नाती जोपासून सर्वांंच्या मनात घर करून बसलेले श्री.संजय हंडोरे पाटील यांनी मुरबाड तालुक्याच्या जन्मभुमीतील गावागावात त्याचबरोबर गावाबाहेर जावून ठाणे जिल्हयासह अन्य जिल्हयात व्यायामशाळेला साहित्य मिळवून देण्यात अविस्मरणीय बाब ठरली आहे.तरूण वर्ग वार्इट मार्गाला न जाता चांगल्या मार्गाला जाऊन आपले भविष्य उज्वल करण्याचा हेतू संजय हंडोरे पाटील यांनी मनात जोपासल्याने तरूण वर्गांचा सहवास आणि ज्येष्ठ नागरिकांचा आशिर्वाद त्यांच्या डोक्यावर कायम राहिला आहे.अशा ढाण्या वाघाची चाल घेऊन समाजासाठी नैतिकता जोपासणार्‍या श्री.संजय हंडोरे पाटील यांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाणे,मुंबर्इ जिल्हयासह अन्य जिल्हयातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मान्यवर,पत्रकार,त्यांचे मार्गदर्शक,सहकारी,तरूणवर्ग,ज्येष्ठ नागरिक,विविध संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी आपली उपस्थिती दाखवली.
त्यांच्या पुढिल कार्यास त्यांना शुभेच्छा दिल्या.त्यांच्या वाढदिवसानिमित्त आदर्श अशा पत्रकारांचा व ह.भ.प यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्याने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.त्यांच्या या कार्यक्रमाला मोठया संख्येने लोकनेते,नागरिक,तरूणवर्ग,ज्येष्ठ नागरिक,विविध संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments