web-banner-lshep2024

Breaking News

रिक्षाचालक '9 जुलै'ला संपावर

BY - मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |

मुंबई-ठाण्यासह राज्यातील अन्य शहरांमधील रस्त्यांवर 9 जुलैला रिक्षा धावणार नाहीत. रिक्षा भाडेवाढ, अवैध प्रवासी वाहतुकीसह ओला, उबरसारख्या टॅक्सी कंपन्यांची सेवा त्वरित बंद करावी, यांसारख्या मागण्यांसाठी रिक्षा चालक-मालक संघटना संपावर जाणार आहेत. त्यामुळं रिक्षानं प्रवास करणाऱ्यांची गैरसोय होणार आहे.रिक्षा/टॅक्सी चालकांच्या मनमानी कारभाराचे फळ म्हणजेच ओला आणि उबेर या कंपन्या. लोकांच्या वाईट परिस्थितीचा वेळी रिक्षा/टॅक्सी चालकांनी फायदा घेऊन सामान्य जनतेकडून पैसे उकळतात.रिक्षा मालक-चालक संघटनांनी राज्य परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत वेळोवेळी बैठका घेऊन त्यांच्यासमोर मागण्या मांडल्या. मात्र, मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात सरकारकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही, असं रिक्षाचालक संघटनांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता पुणे, मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमधील लाखो रिक्षाचालक या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.

No comments