पालघरमध्ये गरिबीला कंटाळून संपूर्ण कुटुंबाने केली आत्महत्या
BY - युवा महाराष्ट्र लाइव – पालघर |
पालघरमध्ये गरिबीला कंटाळून संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली. ही
घटना जव्हार तालुक्यातील खरोंडा या गावातील आहे. जुनमध्ये गरिबीला कंटाळलेल्या नवऱ्याने
गळफास घेवून आत्महत्या केली होती. घरातील कर्ता पुरुष नसल्याने घर कस चालवायचे, मुलांचा
सांभाळ कसा करायचा या विवंचनेतून पत्नी रुक्षणा हांडवाने आपल्या दोन मुलींसह विष पिऊन
आत्महत्या केली. या घटनेत 7 महिन्याची रुशाली वाचली असून तिच्यावर कुटीर रुग्णालयात
उपचार सुरु आहेत. दिपाली असं 3 वर्षीय मृत मुलीचे नाव आहे.सात महिन्याच्या रुशालीवर
रुग्णालयात उपचार सुरु असून ती सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेमुळे गावात सध्या
शोककळा पसरली आहे.



No comments