web-banner-lshep2024

Breaking News

एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. मंगळवारी सायंकाळी 5 वाजता हा निकाल पाहता येणार आहे. सीईटी कक्षाच्या वेबसाइटवर सायंकाळी पाच वाजता हा निकाल प्रसिद्ध होईल.निकालामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्व विषयाचा पर्सेंटाइल स्कोअर आणि पीसीएम आणि पीसीबी ग्रुपचा स्कोअर स्वतंत्रपणे दिला जाणार आहे. प्रवेश परीक्षा कक्षातर्फे हे स्पष्ट करण्यात आले आहे. ऑनलाइन पद्धतीने जाहीर केल्या जाणाऱ्या निकालावर विद्यार्थ्याचे नाव, त्याच्या पालकाचे नाव, आईचे नाव यांचा उल्लेख केला जाणार आहे. यासोतबच निकालावर संबंधित विद्यार्थ्याचे छायाचित्रही असणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित विद्यार्थ्याने किती वाजता निकाल डाउनलोड करून घेतला, याबाबतची माहितीही दिली जाणार असल्याचे प्रवेश परीक्षा कक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments