web-banner-lshep2024

Breaking News

आज सकाळच्या संक्षिप्त घडामोडी


● 2018-19मध्ये विविध बँकांमध्ये आर्थिक घोटाळ्यांच्या 6 हजार 800 प्रकरणांची नोंद, रिझर्व्ह बँकेने दिली धक्कादायक माहिती
● केंद्रीय दूरसंचार मंत्रालयातर्फे चालू वर्षातच फाइव्ह जी व अन्य बॅण्डसंबंधीच्या स्पेक्ट्रम लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल : दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद
● भारतीय हवाई दलाच्या एएन -32 या बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले, या विमानात एकूण 13 जण होते
● तामिळनाडू सरकारचा नवा फतवा, राज्य सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाच्या ठिकाणी फक्त पारंपारिक कपडे परिधान करावे लागणार
● महात्मा गांधींविषयी ट्वीट भोवले, आयएएस निधी चौधरी यांची मुंबई महापालिकेतून मंत्रालयातील पाणी पुरवठा विभागात बदली
● गोदावरीत पाणी आणून संपूर्ण मराठवाड्याला दुष्काळमुक्त करु, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आश्वासन
● Saregama ने लाँच केले ‘कारवां’चे मोबाईल व्हर्जन, किंमत 3,990 रुपये; ‘सारेगामा कारवां’च्या अधिकृत संकेतस्थळावरुन खरेदी करता येणार
● पाकिस्तानने यजमान इंग्लंडला 14 धावांनी पराभूत करत केले शानदार पुनरागमन, मोहम्मद हाफीज ठरला सामनावीर
● दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका, वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या सामन्याला मुकणार
● ‘स्कोर ट्रेंड्स इंडिया’च्या लोकप्रियता चार्टच्यानुसार, दक्षिणात्य अभिनेत्यांमध्ये ‘थलायवा’ रजनीकांतच सर्वाधिक लोकप्रिय

No comments