web-banner-lshep2024

Breaking News

भरधाव कारने चिरडल्याने पादचाऱ्याचा मृत्यू

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |

मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स इथे भरधाव मर्सिडीज कारने एका पादचाऱ्याला धडक दिली आहे. यामध्ये पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. राजेंद्र कुमार असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हिरा व्यापारी ललित अदानी यांचा मुलगा चैतन्य कार चालवत असल्याची माहिती मिळत आहे. ताडदेव पोलिसांनी कार चालक चैतन्यला अटक करुन गुन्हा दाखल केला आहे. आज त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तर वोल्वो गाडी बिग बाजारचे मालक किशोर बियाणी यांची असल्याच समजते. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि मर्सिडीज कार (E350) दुसऱ्या लेनमधून येणाऱ्या BMWवर जोरदार धडकली. या अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. महालक्ष्मी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या के.के. मार्गावरील हा अपघात आहे. याप्रकरणी कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलो आहे.

No comments