web-banner-lshep2024

Breaking News

विकासमंच ट्रस्टच्या अध्यक्षा ज्योतीतार्इ शेलार यांच्या वाढदिवसा निमित्त रूग्णालयात फळ वाटप कार्यक्रम संपन्न

BY - युवा महाराष्ट्र लाइव –  मुरबाड |

ज्याची जाण त्याच व्यक्तीचा अभिमान आज या जगात पहायला मिळत आहे.कोणी समाजाची जाण ठेवतो तर कोणी माणूसकीची तर कोणी गोरगरिबांची अशीच मुरबाड विधानसभेची व्यक्त महत्व असलेले सौ.ज्योतीतार्इ नामदेव शेलार यांनी आपला वाढदिवस तालुक्यातील गोर-गरीब जनते समवेत साजरा केला.
ज्योतीतार्इ शेलार या आमदार किसनराव कथोरे मुरबाड विधानसभा क्षेत्र विकासमंच ट्रस्ट (महाराष्ट्र राज्य) या ट्रस्टच्या महाराष्ट्र महिला अध्यक्षा पदी समाजात गोर-गरीब जनतेला न्याय मिळवुन देण्याचे काम करत असुन त्यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातुन सुध्दा न्याय मिळवुन दिला आहे.
ज्योतीतार्इ शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त मुरबाड ग्रामीण रूग्णालयात रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.यावेळी आमदार किसनराव कथोरे विधानसभा क्षेत्र विकासमंच ट्रस्टचे संस्थापक नामदेव शेलार,अध्यक्षा सौ.ज्योतीतार्इ शेलार,उल्हासनगर महिला अध्यक्षा दिपाली दळवी,मेघा थोरात,सरिता नार्इक व मिलिंद दळवी,विजय डोंगरे,स्वप्नील चव्हाण,कुणाल शेलार,मयुर जाधव,ग्रामीण रूग्णालयाचे डॉ.शिंदे सर्व कर्मचारी व ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments