web-banner-lshep2024

Breaking News

वनक्षेत्रपाल कार्यलयात पहाटे झाला स्फोट

BY - युवा महाराष्ट्र लाइव –  पुणे |
मुळशी येथील वनक्षेत्रपाल कार्यलयात स्फोट झाल्याचे वृत्त आहे. पाहाटे चार वाजता हा स्फोट झाला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत कोणीतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, कार्यालयाच्या इमारतीसह साहित्याचे मोठे नुकसान झाले.

पुणे-कोलाड येथे असलेल्या ताम्हाणी अभयारण्यातील कार्यलयात हा स्फोट झाला आहे. डुक्कर मारण्यासाठी कार्यालयात बॉम्ब आणून ठेवले असल्याचे बोलले जात आहे. याच स्फोटकांचा अचानक स्फोट झाला. सुदैवाने येथे कोणतीही जीवतहानी झालेले नाही. मात्र इमारतीचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली. पोलीस या संपूर्ण घटनेचा पूढील तपास करत आहेत.

No comments