web-banner-lshep2024

Breaking News

पदवीपर्यंत सर्वच जातींना मोफत शिक्षण करा!’ – खासदार संभाजीराजेंचा संताप

BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |  
मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षण आणि सवर्ण आरक्षण ही आणि देशभरातील इतर समाजानुरूप आरक्षणाची प्रकरणे समोर आहेत. या सर्व आरक्षणांना सर्व राजकारण्यांचा, संघटनांचा पाठिंबाही आहे, परंतु पाणी मुरतंय कुठं? आरक्षणाच्या या प्रश्नावर उद्विग्न होत खासदार संभाजीराजे भोसले यांनी ट्विटवर संताप व्यक्त केला आहे.

उस्मानाबाद येथील देवळाली गावातील मराठा समाजातील युवक अक्षय शहाजी देवकर याने आपले आयुष्य संपवले. नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत त्याला ९४% गुण मिळूनसुद्धा चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नव्हता. यामुळे हिरमोड होऊन त्यानं टोकाचा निर्णय घेतला. यामुळे खासदार संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला आहे. एकापाठोपाठ अनेक ट्विट करत खासदार संभाजीराजेंनी आपल्या भावनांना वाट करून दिली.

No comments