web-banner-lshep2024

Breaking News

चेक बाऊन्स प्रकरणी अभिजीत बिचुकलेंना अटक

BY - युवा महाराष्ट्र लाइव – सातारा |  
बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धक अभिजीत बिचुकलेंना अटक करण्यात आली आहे. साताऱ्यातील चेक बाऊन्सप्रकरणी त्यांना बिग बॉसच्या घरातूनच अटक झाली आहे. आरे पोलिसांच्या मदतीने सातारा पोलिसांनी बिचुकलेंना अटक केली आहे.

स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणाऱ्या अभिजीत बिचुकलेंनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यांनी कित्येकदा खुलेआम आव्हान दिलं आहे.

No comments