पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त अहमदनगरमध्ये राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळयाचे आयोजन
BY - युवा महाराष्ट्र
लाइव - अहमदनगर |
अहमदनगर जिल्हा क्रिडा कार्यालय,जिल्हा महिला
व बाल विकास अधिकारी कार्यालय,जिल्हा समाज कार्यालय जिल्हापरिषद अहमदनगर आणि जय मल्हार
शौक्षणिक व बहुउदेशिय सामाजिक संस्था केडगांव अहमदनगर यांच्या सयुंक्त विद्यमाने भव्य
राजस्तरीय सामाजिक जिवन गौरव पुरस्कार व सन्मान सोहळयाचे आयोजन लक्ष्मी नारायण मंगल
कार्यालय टिळक रोड अहमदनगर रविवार 23 जुन 2019 रोजी सकाळी 10 ते 3 वाजता या कालावधीत
पार पडणार आहे.जय मल्हार शौक्षणिक व बहुउदेशीय सामाजिक संस्था अध्यक्ष
कांतीलाल जाडकर,सचिव सौ निलम जाडकर व त्यांच्या सहकार्यांनी आयोजित केलेल्या पुरस्कार
गुणगौरव सोहळया निमित्ताने लोककला सादरीकरण मुलगी शिकवा मुलगी वाचवा अभियान,स्वच्छता
अभियान,व्यसन मुक्ती प्रबोधन असे अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.कार्यक्रमाला प्रमुख
अतिथि म्हणुन विविध श्रेत्रातील मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.



No comments