web-banner-lshep2024

Breaking News

भोकर-नांदेड रस्त्यावर SRPF जवानांच्या वाहनाचा अपघात

BY - युवा महाराष्ट्र लाइव - नांदेड |
गडचिरोली येथून नांदेडकडे निवडणूक निकाल बंदोबस्ताच्या कामासाठी जाणाऱ्या एसआरपीएफ जवानांच्या वाहनाला भोकर-नांदेड रस्त्यावर बारडजवळ अपघात झाला. बुधवारी सकाळी साडेसात वाजता अपघात झाल्याची माहिती असून या दुर्घटनेत एक जवान गंभीर, तर 13 किरकोळ जखमी झाले आहेत.राज्य राखीव दलाचे गट नं. १३ गडचिरोलीचे वाहन (क्र. एमएच ३१ डीझेड ०२५२) नांदेडकडे जात असताना समोरील वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात उलटले. अपघातानंतर जखमींना बाहेर काढण्यासाठी महामार्गाचे पोलीस कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी मदत केली.


No comments