ईव्हीएमवर ठेवली जाणार काटेकोर नजर
BY - युवा महाराष्ट्र लाइव - नवी दिल्ली |
2019 च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही
तासात हाती येणार आहेत. आता फायनल काउंटडाउन सुरू झाले आहे. भारतीय लोकशाहीत कोणत्या
राजकीय पक्षाचे सरकार उभारले जाणार हे आता लवकरच स्पष्ट होईल. खरंतर एक्झिट पोलनुसार
भाजपची सत्ता येण्याचे संकेत देण्यात आले आहे. मात्र विरोधी पक्षांनी
या सर्वांचे खापर ईव्हीएमवर फोडण्यास सुरूवात केली आहे.ईव्हीएमसंबंधीत अनेक ओराप निवडणूक
आयोगाने नेहमीच फेटाळून लावले आहेत. आता आयोगाने ईव्हीएमसंबंधीत तक्रारींवर तात्काळ
अॅक्शन घेण्यासाठी कंट्रोल रुमची स्थापना केली आहे. मंगळवारी राजधानी दिल्लीत एकीकडे
22 राजकीय पक्षांचे नेते ईव्हीएमविरुद्ध आवाज उठवणार होते. तेव्हाच निवडणूक आयोगाच्या
कार्यालयात ईव्हीएमसंबंधीत तक्रारी मिटवण्यासाठी कंट्रोल रूम स्थापन करण्यात आले. निवडणूक
आयोगानुसार हे कंट्रोल रुम निवडणूकांचे निकाल येईपर्यंत 24 तास कार्यरत राहणार आहे.
या माध्यमातून ईव्हीएमच्या तक्रारींवर तात्काळ कारवाई केली जाऊ शकते.



No comments